Breaking News

इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेची मुधोजी हायस्कूल येथील बैठक व्यवस्था

Class 10th Board Exam Meeting Arrangement at Mudhoji High School

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण केंद्र क्र.-1001 ची बैठक व्यवस्था महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागा तर्फे आयोजित केलेल्या एस. एस.सी बोर्ड परीक्षा मार्च 2024 ची मुधोजी हायस्कूल व ज्युनि.कॉलेज फलटण केंद्र क्र. 1001 येथे दि. 01/03/2024 ते 26/03/2024 या कालावधी परीक्षा होणार असुन परीक्षा क्रमांक FO23805 ते FO24603 या क्रमांकांची बैठक व्यवस्था केली आहे. तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी.

    विद्यार्थ्यांनी वरील केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रका प्रमाणे प्रवेश पत्रिका (रिसीट) , ओळख पत्र व लेखन साहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळे पूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे, विद्यार्थ्याने परीक्षा केंद्राच्या आवारात मोबाईल आणू नये. विद्याध्यनि कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपी मुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा दयावी. तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पारपाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन शाळेचे प्राचार्य श्री.बी. गंगवणे व केंद्राच्या केंद्रसंचालिक सौ बगाडे. एस्. ए मॅडम ( उपप्राचार्या), मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, फलटण यांनी केलेले आहे.

No comments