Breaking News

पॅंथर अजित अहिवळे यांचे दुःखद निधन

Panther Ajit Ahivale's sad demise

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ - :  भारतीय दलित पॅंथरची चळवळ फलटण मध्ये उभी करण्यात मोलाचे योगदान असणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक अजित शंकर अहिवळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आयु.सिद्धार्थ अहिवळे यांचे ते वडील होते.

    भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यात अजित अहिवळे यांनी योगदान दिलेले आहे. त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीत देखील त्यांचे मोलाचे योगदान आहे. अजित अहिवळे यांच्या निधनामुळे, फलटणच्या आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

    अजित अहिवळे यांच्यावर दि.२१ राजी फलटण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवार दि. २२/०२/२०२४ रोजी  दुपारी १२ : ३० वाजता पंचशील चौक मंगळवार पेठ फलटण येथे पुण्यानुमोदन व बुद्धपूजा संस्कार विधी कार्यक्रम संपन्न होणार आहे.

No comments