Breaking News

दि. २४ फेब्रुवारी रोजी फलटण तालुक्यात गावागावातील प्रमुख मार्गावर रास्ता रोको

On February 24th, stop the road on the main road in every village in Phaltan taluka

    

  या ठिकाणी होणार रास्ता रोको .....

आसू - फलटण रोड वर राजाळे, आळंदी - पंढरपूर - महाड राष्ट्रीय महामार्गावर वाजेगाव, फलटण - शिखर शिंगणापूर रोड सोनवडी बुद्रुक, फलटण - दहिवडी रोड झिरपवाडी, फलटण - पुसेगाव रोड वाठार निंबाळकर वाठार फाटा, फलटण - सातारा रोड बिबी फाटा, फलटण - लोणंद - पुणे रोड बडेखान तसेच पाडेगाव येथील पूल, फलटण - बारामती रोड सांगवी, खुंटे येथील नवीन पूल, होळ येथील पूल या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होणार आहे, तरी तेथील आसपासच्या सकल मराठा बांधवानी त्या त्या ठिकाणी जाऊन सनदशीर मार्गाने सकाळी व सायंकाळी रस्ता रोको मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. २२ :  मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी फलटण तालुक्यातील प्रत्त्येक गावात आणि तालुक्यातील प्रमुख मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेत तसेच सध्या इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा सुरु असल्याने कोणत्याही विद्यार्थी/विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी सर्व मराठा बांधवानी घ्यावी, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा फलटणच्यावतीने करण्यात आले आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य सरकारने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना सगेसोयरे आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिले होते, तसेच कायदेशीर व ५० टक्केच्या आतील ओबीसी प्रवर्गातील आरक्षण द्यावे अशी मागणी केली होती, परंतू ५० टक्केच्या वरील आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा समाज किंवा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली नाही, ५० टक्केच्या वरील आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकणारे नसून ते देऊन एक प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार हे चालढकल करीत असल्याचे निषेधार्थ शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते ७ यावेळेत तालुक्यातील सर्व प्रमुख गावात तसेच मुख्य रस्त्यावर सदर रास्ता रोको आंदोलन सनदशीर मार्गाने होणार असून या आंदोलनाला कोणीही हिंसक करु नये किंवा करु देऊ नये तसेच या रस्ता रोकोला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास त्या लोकांची माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटण व स्थानिक पोलीस ठाण्यात किंवा पोलीस अधिकारी, ठाणे अंमलदार किंवा बिट अंमलदार, गाव पोलीस पाटील यांना द्यावी असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा फलटणने केले आहे.

No comments