Breaking News

साखरवाडी येथील चॉकलेट फॅक्टरीत चोरी

 

Theft in chocolate factory at Sakharwadi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ - साखरवाडी येथील बंद अवस्थेतील चॉकलेट फॅक्टरीतील तांब्याच्या पाईप्स व तांब्याची तार असा एकूण ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेली आहे. या प्रकरणी आज्ञात चोरट्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

    याबाबत फलटण ग्रामिण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३  ते  २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत साखरवाडी येथील बंद असलेल्या डॉक्टर रायटर फूडस प्रायव्हेट लिमिटेड, साखरवाडी या चॉकलेट कंपनीतून अज्ञात चोरट्याने ५० किलो वजनाची तांब्याची पाईप व तार असलेली वायर चोरून नेली. या बाबत ऋषिकेश बनकर यांनी फिर्याद दिली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर अरगडे  करीत आहेत.

No comments