Breaking News

पती-पत्नीला मारहाण करून पत्नीचा विनयभंग ; दोघांवर गुन्हा दाखल

Abuse of wife by beating husband and wife; A case has been registered against both

    फलटण(गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २१ मे -  बंद केलेल्या समायिक मोटरीचा फ्युज मागण्यासाठी गेलेल्या पतीला मारहाण करून, पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांच्या विरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण पोलीस स्टेशन कडून मिळालेले माहितीनुसार, दिनांक २०/५/२०२३ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास, मौजे वाखरी  ता. फलटण गावचे हद्दीत पिंपळाचा मळा नावाच्या पीडित महिलेच्या शेतात, १) केतन दत्तात्रय ढेकळे २) मेघनाथ भैरवनाथ ढेकळे दोन्ही राहणार वाखरी ता. फलटण यांनी  पीडित महिलेच्या सामायिक मोटारीचा फ्युज काढला होता, तो फ्युज पीडित महिला व  पती  मागण्यास गेल्यावर, केतन ढेकळे व मेघनाथ ढेकळे यांनी  पतीला व पीडित महिलेला हाताने लाथा बुक्क्याने  मारहाण करून, शिवीगाळ दमदाटी केली व केतन ढेकळे यांनी पीडितेचा उजवा हात धरून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार कदम या करीत आहेत.

No comments