Breaking News

वाखरीच्या यात्रेत छबीना काढण्यास व करमणूकीच्या कार्यक्रमास मनाई ; जमाव बंदी आदेश जारी

Mob ban order issued and entertainment programs banned during Vakhri Yatra

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  मौजे वाखरी, ता. फलटण जि.सातारा येथील यात्रेचे अनुषंगाने गावातील दोन्ही गटाचा वाद मिटत नसल्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून दिनांक १२/०४/२०२३ ते ते १७/०४/२०२३ पर्यंत क्रिमीनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश पारित करण्यात आले आहेत. यात्रेतील कार्यक्रमास पुजारी - मानकरी सोडून इतर लोकांना मनाई करण्यात आली आहे. तसेच देवाचा छबीना काढण्यास मनाई करण्यात येत असून, सदर कालावधीमध्ये मौजे वाखरी गावामध्ये कोणतेही करमणूकीचे कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत असे आदेश उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी पारित केले आहेत.

वाखरी गावातील यात्रा ही दिनांक १२/०४/२०२३ ते ते १७/०४/२०२३ रोजी साजरी होणार आहे. सदर गावातील यात्रेवेळी दोन्ही गटात भांडणे होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. गावातील दोन्ही गट हे एकमेकांचे ऐकण्याचे स्थितीत नाही.  दि. २०/०२/२०२३ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय फलटण याठिकाणी सदर प्रकरणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून समन्वय बैठक आयोजित करण्यात आलेली होती. दिनांक २२/०३/२०२३ रोजी गुडीपाडव्यादिवशी गावकरी यांची यात्रेसंबंधाने पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांचेमार्फत मिटींग गावात घेणेत आली. सदर मिटींगला वाखरी गावातील दोन्ही गटाचे ३०० ते ४०० लोक उपस्थित होते. सदर मिटींगवेळी गावकरी यांचेसमोर यावर्षी यात्रेला सर्वांची वर्गणी घ्यायची का असा विषय निघाला असता दोन्ही गटाचे लोकांनी गोंधळ घातला असून दोन्ही गटात किरकोळ भांडणे झाली. त्याअनुषंगाने गावात दिनांक २२/०३/२०२३ रोजी रात्रभर पोलीस बंदोबस्त ठेवणेत आलेला होता. तसेच उपविभागीय अधिकारी फलटण, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, तहसिलदार फलटण, पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांचेसमवेत दि. ०४/११/२०२३ रोजी दोन्ही गटातील ग्रामस्थ यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तरीही दोन्ही गटातील समझौता न झाल्यामुळे वाखरी गावातील यात्रेस देवाची हळदीचा कार्यक्रम, देवाचे लग्नसोहळा व करमणूकीचे कार्यक्रम होत असल्यामुळे सदर गावातील यात्रेवेळी दोन्ही गटात भांडणे होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ प्रमाणे मौजे वाखरी गावातील दिनांक १२/०४/२०२३ ते १७/०४/२०२३ रोजी होणाऱ्या यात्रेस देवाची हळदीचा कार्यक्रम, देवाचे लग्नसोहळा या कार्यक्रमास मंदिरातील पुजारी व मानकरी वगळून सदर कार्यक्रमास इतर लोकांना मनाई करण्यात येत आहे. तसेच देवाचा छबीना काढण्यास मनाई करण्यात येत आहे. सदर कालावधीमध्ये मौजे वाखरी गावामध्ये कोणतेही करमणूकीचे कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत असे आदेश उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी पारित केले आहेत.

No comments