युवा महोत्सवात मुधोजी महाविद्यालयाचा डंका ; आठ पारितोषिके
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी आयोजित मध्यवर्ती युवा महोत्सवात १) लोकसंगीत वाद्यवृंद सलग तीन वर्षे प्रथम २) लघुनाटिका -द्वितीय ३) पाश्चिमात्य समूहगीत-द्वितीय तर ४) भित्तिचित्रण-द्वितीय ५) व्यंगचित्रण-तृतीय ६) स्थळ छायाचित्रण -द्वितीय ७) नकला-तृतीय ८) पाश्चिमात्य एकलगायन - उत्तेजनार्थ असे सांघिक व वैयक्तिक आठ स्पर्धाप्रकारात महाविद्यालयाने यशाची परंपरा अबाधित ठेवून शिवाजी विद्यापीठात आपले स्थान कायम ठेवले आहे.
कलाविष्कारच्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, कलाविष्कार विभागप्रमुख प्रा.लक्ष्मीकांत वेळेकर, प्रा. विशाल गायकवाड, प्रा. हर्षवर्धन कुलकर्णी, प्रा. अक्षय अहिवळे, प्रा. मोनिका शेंडे , प्रा. गायत्री पवार व प्रा.सौ. शिल्पा शिंदे या समिती सद्यस्यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय इंद्रधनुष्य स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठाच्या संघात ओम शिंदे,ओंकार दाने, राधा गायकवाड, विजय क्षीरसागर, जान्हवी जाधव या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली त्याबद्दल सर्व स्तरातुन विद्यार्थ्यांचे व कलाविष्कार विभागप्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांचे कौतुक होत आहे.
No comments