Breaking News

प्रचंड पावसाने शेतकरी हवालदिल : श्रीमंत विश्वजीतराजे यांचा शेतकर्‍यांना दिलासा

भरपावसात अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करताना श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर समवेत शुभम नलवडे, सौरभ निंबाळकर व इतर 
Inspection of heavy rainfall area by Srimanta Vishwajitaraj Naik Nimbalkar

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १० - फलटण तालुक्यात प्रचंड पाऊस झाला असून उभ्या पिकांसह जमिनीची बांधबंदिस्ती वाहुन गेल्याने मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप झाली आहे. परिणामी शेतकरी व सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले असून या सर्वांचे तातडीने पंचनामे करुन आपत्ती ग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणीप्रसंगी श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे  व इतर 

       फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील आळजापुर, कापशी, आदर्की, सासवड, हिंगणगाव या भागातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिके, शासकीय इमारती, जमिनी, राहती घरे, रस्ते, पूल यांची पाहणी श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, विलासराव नलवडे, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांसमवेत केली.

अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करताना श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर समवेत विलासराव नलवडे व इतर 

      या भागात सलग ४/५ दिवस ढगफुटी सदृश्य प्रचंड पाऊस पडत असल्याने शेतीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्याचबरोबर रस्ते, पूल, जिल्हा परिषद प्रा. शाळा इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पाझर तलाव, बंधारे  फुटल्यामुळे शेतीत पाणी गेल्याने उभी पिके व जमिनींचे मोठे नुकसान झाले आहे, त्याचीही पाहणी श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, स्थानिक प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी यावेळी पाहणी केली. 

          श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी लवकरात लवकर पंचनामे करुन घेऊन शेतकरी वर्गाला तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी श्रीमंत  विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे यावेळी केली.

     संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामध्ये प्रामुख्याने बाजरी, सोयाबीन, कांदा, मका, सूर्यफूल आणि भाजीपाला या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

     हाच हंगाम शेतकऱ्यांना आर्थिक घडी बसविण्यासाठी उपयुक्त असतो पण सलग ४/५ दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी वर्गाची आर्थिक घडीच विस्कटली आहे.  शासनाने कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करुन त्यांना सहकार्य करावे अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे.

No comments