Breaking News

स्वप्निल सुनील पाटील यांचे सी. ए. परीक्षेत यश

Success of Swapnil Sunil Patil in CA exam

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वेणुताई चव्हाण हायस्कूल तरडगावचे प्राचार्य सुनील पांडुरंग पाटील यांचे सुपुत्र स्वप्निल उर्फ हर्षवर्धन पाटील यांनी चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उत्तम गुण मिळवून यश संपादन केले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

   स्वप्निल उर्फ हर्षवर्धन पाटील यांचे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण कमला निमकर बाल भवन फलटण येथे झाले.  अकरावी ते बी. कॉम. चे शिक्षण बी.एम.सी. महाविद्यालय पुणे येथे झाले. सी.ए. आर्टिकलशिप पुणे येथे एच. एम. ए. या नामवंत फर्ममध्ये पूर्ण केले. 

    स्वप्निलच्या या यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके ), संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके ), तसेच गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य महेंद्र सुभाषराव सूर्यवशी (बेडके ) व सर्व उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

       जाधववाडी ग्रामपंचायतचे  मा.उपसरपंच व विद्यमान सदस्य दिपक सपकळ, झणझणे सर, बोबडे सर, भोसले सर, वाघमोडे सर, सूपे सर, डाॅ.इंगवले व सुखदेव अहिवळे (नाना) आदी मान्यवर यांनी स्वप्नील यास पुढील वाटचालीस शुभेच्छां दिल्या आहेत. तसेच अक्षत रेसीडेन्सी, नाळेमळा, जाधववाडी येथील ग्रामस्थांनीही स्वप्नीलचे अभिनंदन केले.

No comments