Breaking News

लोहार समजासाठी लोकनेत्यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरत असल्याचा आंनद - ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर

Happy that the dream seen by the Late. Hindurao Naik Nimbalkar is coming true for Lohar Samaj

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - माजी खासदार लोकनेते कै. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांनी  लोहार समजासाठी पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरत आहे. लोहार समाज भवन ही लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे स्वप्न होते व ते पूर्ण करण्याचे भाग्य आम्हास लाभले याचा  आनंद होत असल्याची भावना व्यक्त करून लोहार समाजाच्या पाठीशी खासदार साहेब सतत असतील अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी दिली.

     खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेले व फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर व अभिजीत नाईक निंबाळकर सहकार्याने, माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या प्रयत्नातून, मलठण, फलटण येथे लोहार समाज भवनाचे भूमिपूजन  जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. जिजामाला रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ॲड. जिजामाला बोलत होत्या.  याप्रसंगी श्री अभिजीत पृथ्वीराज नाईक निंबाळकर,माजी नगरसेवक  सचिन अहिवळे सर, माजी नगरसेविका सौ मीनाताई नेवसे, श्री राजाभाऊ नागटिळे, श्री अरविंद मेहता, श्री जाधव महाराज, श्री बबनराव बोके, श्री.देविदास पवार, श्री सागर लांभते, माजी नगरसेवक श्री सुरेश रघुनाथ पवार, श्री रामदास गणपत थोरात, श्री रवींद्र यशवंत माने, श्री रवींद्र औदुंबर पवार, श्री सुभाष बाबुराव कळसाईत.श्री जयकुमार शंकर पवार, श्री प्रभाकर नारायण पवार, श्री दत्तराज नामदेव थोरात, श्री लखन श्रीरंग थोरात, श्री धनंजय विजय पवार, भारत तुकाराम अंकुश श्रीमती कांताबाई डेंगरे, तसेच बहुतांश समाज बांधव भगिनी व फलटण तालुका लोहार समाज सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष आशुतोष दत्तराज थोरात, खजिनदार श्री नितीन सुभाषराव कळसाईत, सदस्य श्री संजोग यशवंत माने, श्री राजेश गजानन माने, श्री अरुण औदुंबर चव्हाण, श्री ज्ञानेश्वर पांडुरंग शिंदे श्री सागर बबन पवार, श्री सुचित सुरेश पवार, श्री अमित बाळासाहेब थोरात, श्री प्रदीप अर्जुन हरिहर, श्री किशोर भारत अंकुश, श्री अर्जुन जगन्नाथ थोरात, श्री अमोल ज्ञानेश्वर पवार, संतोष भरत पवार  उपस्थित होते.

    याप्रसंगी माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी लोहार समाज भवनाचे उत्तमात उत्तम प्रकारे काम कसे होईल याची माहिती उपस्थित जनसमुदायासमोर व्यक्त केली.

     लोहार समाज भवन निर्माण करत असल्याबद्दल लोहार समाज  खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा कायमस्वरूपी ऋणी राहील. लोकनेत्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे याचा आनंद संपूर्ण लोहार समाज व्यक्त करीत आहे व आजच्या कार्याबद्दल लोहार समाज पूर्णपणे समाधानी आहे . लोहार समाज खासदार साहेबांच्या पाठीशी कायमस्वरूपी उभा राहील अशी ग्वाही फलटण तालुका लोहार समाज सेवाभावी संस्थेचे सचिव अतुल ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.

    फलटण तालुका लोहार समाजसेवा भावी संस्थेचे अध्यक्ष  निलेश उर्फ बबलू प्रभाकर पवार यांनी  खासदार साहेब तसेच संपूर्ण समुदायाचे केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

No comments