Breaking News

दुधेबावी बिरोबा मंदिर येथे मारामारी - चौघांच्या विरोधात गुन्हा

Fight at Dudhebavi Biroba Temple - Crime against four

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : कुलदैवताच्या मंदिरासमोर भांडण करु नका असे म्हटल्याच्या कारणावरुन दुधेबावी ता. फलटण येथील एकास मारहाण केल्या प्रकरणी ४ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

     याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, २९ जुलै रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास दुधेबावी ता. फलटण गावच्या हद्दीतील दडस वस्ती येथील बिरोबा मंदिरासमोर वाद सुरु होता. यावेळी बाळू पोपट सोनवलकर वय ३२ रा. दुधेबावी ता. फलटण हे आमच्या कुलदैवताचे मंदिरामध्ये भांडण करू नका असे म्हटल्याने चिडून जाऊन तेथील व्यक्तीने त्यांना लोखंडी गजाने व त्याच्या सोबत असलेल्या एक महिला व दोन पुरुषांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सोनवलकर हे जखमी झाले आहेत. तेथील लोकांकडून त्यांना गजाने मारहाण करणारे व्यक्तीचे नाव भानुदास एकनाथ उराडे असे असल्याचे समजले. यावरुन भानुदास एकनाथ उराडे ( पत्ता माहिती नाही ) व त्याच्या सोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींविरुध्द ( नाव व गाव माहिती नाही ) फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद बाळू सोनवलकर यांनी दिली असून तपास पोलिस नाईक देशमुख करीत आहेत.

No comments