Breaking News

नवऱ्याचे तिसरे लग्न रोखणाऱ्या पत्नी व कुटूंबियांना मारहाण

Beating the wife and family who prevented the third marriage of the husband

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : तिसरे लग्न करण्यास नवऱ्याला रोखल्याने नवऱ्यासह कुटूंबातील सदस्यांनी पत्नीस व तीच्या कुटूंबियांना मारहाण केल्याची घटना दुधेबावी ता. फलटण येथे घडली असून या प्रकरणी नवऱ्यासह एकुण सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

       याबाबत फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, किर्ती गणेश एकळ वय ३१ रा. नातेपुते ता. माळशिरस, जि. सोलापूर यांना त्यांचे पती तिसरे लग्न करीत असल्याची माहिती मिळाल्याने त्या २९ जुलै २०२२ रोजी साडेबाराच्या सुमारास दुधेबावी गावच्या हद्दीतील दडस वस्ती येथील बिरोबा मंदिर येथे गेल्या असता तीथे त्यांना विकास वामन एकळ, गणेश वामन एकळ, संगीता विकास एकळ, कांताबाई वामन एकळ, डॉक्टर एकळ पूर्ण नाव माहित नाही सर्व रा. दुधेबावी तालुका फलटण, रोहिणी दत्तात्रेय गंगाने रा. उंचगाव ता. करविर जि. कोल्हापूर व इतर अनोळखी व्यक्तींनी शिवीगाळ, दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली या मारहाणीत फिर्यादी किर्ती एकळ यांचा भाऊ भानुदास उराडे, चुलत भाऊ हेमंत उराडे, तुकाराम उराडे, आई लोचना उराडे, चुलती लता उराडे हे जखमी झाले व यावेळी किर्ती एकळ यांच्या पायातील जोडवी, मोबाईल, गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाली आहे. या प्रकरणी वरील सर्व सहा जणांविरुध्द फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढिल तपास पोलिस हवालदार खाडे करीत आहेत.

      दरम्यान या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना न्यायालयाने जामिन मंजूर केला असल्याची माहिती मिळत असली तरी पोलिस यंत्रणेकडून याबाबत अधिकृतपणे कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

No comments