Breaking News

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - सुभाष नागरे

Farmers should benefit from Pradhan Mantri Micro Food Processing Scheme - Subhash Nagre

    सातारा :    प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत वाई येथील   मम् स् फूड, तसेच पाचवड येथील  सुरेखा बंदर यांच्या कैलास फूड चिक्की प्रक्रिया उद्योग प्रकल्पांची पाहणी   पुणे येथील नियोजन व प्रक्रिया कृषी आयुक्तालयाचे संचालक सुभाष नागरे यांनी करुन प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असेही आवाहन केले.

    पाहणी प्रसंगी  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  विजयकुमार राऊत, वाईचे तालुका कृषी अधिकारी   प्रशांत शेंडे, मंडळ कृषी अधिकारी अनिल महामुलकर, शहाजी शिंदे, राजेंद्र डोईफोडे, कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब शेलार, माणिक बनसोडे, कृषी सहायक निखिल मोरे  उपस्थित होते.

    श्री. नागरे यांनी  प्रक्षेत्र भेटी दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत हळद साठवणूक गृहाची पाहणी केली.

No comments