Breaking News

तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ११ पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’

11 policemen of Maharashtra awarded 'Central Home Minister Medal' for outstanding performance in investigations

    नवी दिल्ली, दि. 13 : वर्ष 2022 च्या केंद्रीय गृहमंत्री पदकांची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये तपासात उत्कृष्ट कामगिरी  करणाऱ्या  महाराष्ट्रातील 11 पोलिसांना पदक जाहीर झाले आहे.vदेशभरातील एकूण 151 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

    गुन्ह्याच्या तपासातील उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तपासातील अशा उत्कृष्टतेला मान्यता देण्याच्या उद्देशाने या पुरस्काराची सुरूवात वर्ष  2018 पासून करण्यात आली. यावर्षी महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपास’ जाहीर झाले आहेत.

    राज्यातील पोलिसांमध्ये  1) श्री कृष्णकांत उपाध्याय, उप पोलीस आयुक्त ,  2) श्री प्रमोद भास्करराव तोरडमल, निरीक्षक,  3) श्री मनोज मोहन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, 4) श्री.दिलीप शिशुपाल पवार, निरीक्षक, 5) श्री अशोक तानाजी विरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) 6) श्री अजित भागवत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) 7) श्रीमती राणी तुकाराम काळे, सहाय्यक निरीक्षक, 8) दिपशिखा दिपक वारे, निरीक्षक, 9) श्री.सुरेशकुमार नानासाहेब राऊत, निरीक्षक, 10) श्री जितेंद्र बोडप्पा वनकोटी, निरीक्षक, 11)श्री समीर सुरेश अहिरराव, निरीक्षक यांचा समावेश आहे.

    यासह केंद्रीय अन्वेषण ब्यूरो ( सीबीआय)चे 15, मध्य प्रदेशमधून 10 पोलीस अधिकारी-कर्मचारी, उत्तर प्रदेशातून 10 पोलीस अधिकारी-कर्मचारी, केरळमधून पोलीस 8, राजस्थानमधून 8 पोलीस , पश्चिम बंगालमधून 8 आणि उर्वरित राज्यांमधून तसेच केंद्रशासित प्रदेशातून पोलीस आहेत. पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांमध्ये  28 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

No comments