Breaking News

रविवार पेठेत पर्सची चोरी ; ३ तोळे सोन्याचे दागिने व कागदपत्रे चोरीस

Purse theft in Raviwar Peth; gold jewelry and documents stolen

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  रविवार पेठ फलटण येथील राहुल ट्रेडर्स या दुकानासमोर लावलेल्या मोटार सायकलच्या हॅन्डलला अडकविलेली पर्स, अज्ञात चोरट्याने चोरून नेली. पर्समध्ये पावणेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण व अडीच ग्रॅम सोन्याची अंगठी व कागदपत्रे असा एकूण 55 हजार रुपये किंमतीचा ऐवज होता.

    याबाबत अधिक माहिती अशी की, सागर लक्ष्मण बोरावके  व्यवसाय किराणा दुकाण रा. शिंदेवाडी (१८ फाटा) ता. फलटण हे त्यांच्या पत्नीसह दि.१७ जून २०२२ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास किराणामाल खरेदी करण्यासाठी रविवार पेठ फलटण येथील राहुल ट्रेडर्स या होलसेल दुकानात मोटारसायकल वरून आले. दुकानासमोरच गाडी उभी केली.  बोरावके यांच्या पत्नीने त्यांची पर्स मोटर सायकलच्या हँडलला अडकवली व ते खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. ही संधी साधून कोणीतरी अज्ञात इसमाने मोटार सायकलच्या हॅन्डलला अडकविलेली पर्स चोरून नेली. पर्समध्ये पावणेतीन तोळ्यांचे ठिकठिकाणी काळे मनी व पदक असलेले सोन्याचे गंठण व अडीच ग्रॅम वजनाची एक सोन्याची फुलाची डीझाईन असलेली लेडीज अंगठी, सौ स्नेहल बोरावके यांच्या नावाचे मतदान कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड व एस बी आय बँकेचे पासबुक व एटीएम कार्ड असा एकूण ५५ हजार रुपये किंमतीचा ऐवज होता. 

No comments