Breaking News

जिल्हा रुग्णालयात मोफत टु डी इको तपासणी शिबिराचे आयोजन

Organizing free 2D echo screening camp at district hospital

    सातारा  : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत हृदय शस्त्रक्रियासाठी संदर्भीत केलेल्या बालकांचे टु डी  इको तपासणी  मोफत शिबिर आयोजित केलेले आहे. हे शिबीर दि. 4 व 5 जून 2022 रोजी सकाळी 9 वाजता डीईआयसी विभाग जिल्हा रुग्णालय सातारा या ठिकाणी आयोजित केले आहे.

    या शिबिरास श्री. सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर ॲन्ड ट्रेनिंग इन पेडियाट्रीक कार्डीयाक स्किल्स, खारघर नवी मुंबई येथील तज्ञ उपस्थितीत राहणार आहेत. सातारा जिल्ह्यातील ज्या बालकांची  हृदय शस्त्रक्रिया पुर्व  टु डी  इको तपासणी करावयाची आहे.अशा बालकांना आपण डीईआयसी विभाग जिल्हा रुग्णालय सातारा या ठिकाणी उपस्थितीत ठेवण्यात यावे. असे अवाहन जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ. सुभाष चव्हाण, यांनी केले आहे.

No comments