Breaking News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. इंग्रजीत सुमित वाघमारे प्रथम

Savitribai Phule Sumit Waghmare first in MA English from Pune University

    सातारा : येथील सुमित सुभाष वाघमारे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मे २०२० मध्ये घेतलेल्या एम.ए.इंग्रजी परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. विद्यापीठाने एम.ए.इंग्रजी विषयात विद्यापीठात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास देण्यात येणारे ‘आळेगावकर बंधू स्मती सुवर्ण पारितोषिक’ जाहीर झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा  पदवीदान समारंभ १२ मे २०२२ रोजी पुणे विद्यापीठाच्या आवारातील लॉनवर घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी प्रोफेसर डॉ.भूषण पटवर्धन तसेच महाराष्ट्र राज्याचे उच्चशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांच्या सन्माननीय उपस्थितीत सुमित यास कुलगुरू नितीन करमळकर यांचे हस्ते एम.ए. इंग्रजी विषयाची पदवी व गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

    रयत शिक्षण संस्थेतील छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.सुभाष वाघमारे व रयत शिक्षण संस्थेत जयसिंगराव मल्हारी करपे विद्यालयात मुख्याध्यापकपदी काम करणाऱ्या इंग्रजी विषयाच्या सुनिता सुभाष वाघमारे यांचा सुमित हा मुलगा आहे.सुमितने आजवर माढा येथे प्राथमिक शिक्षण, मंचर व लोणंद येथे माध्यमिक शिक्षण घेतले. रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इंन्सीट्युट ऑफ सायन्स  कॉलेजमध्ये त्याने भौतिकशास्त्र विषयात बी.एस्सी. पदवी शिक्षण पूर्ण केले. त्याने इंग्रजी भाषा विषयाचे शिक्षण पुणे येथे फोरम फॉर कल्चर स्टडीज इंन्सीट्युट ऑफ अडव्हांस इन इंग्लिश,औंध पुणे या संस्थेत घेतले.डॉ.अशोक थोरात यांनी त्यास मार्गदर्शन केले.सुमित २०२२ मध्ये इंग्रजी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे..सुमित सध्या रयत शिक्षण संस्थेच्या आझाद शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बी.एड.पदवीसाठी शिक्षण घेत आहे. पुण्यात महानगरपालिकेतील मराठी शाळात विज्ञान विषयाचे अध्यापन करण्याचे काम त्याने केले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इंन्सीट्युट ऑफ सायन्स  कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना सुमितने  उत्साही संवादी,व संयमी स्वभावामुळे व इंग्रजी विषयाची आवड असल्याने त्याने साताऱ्यात भारताचे राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या मुलाखती. घेतल्या होत्या. सर्जनशील लेखन करण्यामुळे पारिजातक नियतकालिकातील त्याच्या लेखनास विद्यापीठाची प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळाली आहेत.सुमितने स्वावलंबी होत साताऱ्यात विज्ञान आणि गणित विषयाचे अध्ययन करण्यासाठी स्वतंत्र सुगत लर्निंग सेंटर सुरु केले आहे. त्याच्या शैक्षणिक  यशामुळे रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर,रयत शिक्षण संस्थेचे ऑडीटर प्राचार्य डॉ.शिवलिंग मेंनकुदळे, आझाद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वंदना नलवडे, कर्मवीर विद्या प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक प्राचार्य आर.के. शिंदे, प्रा.चंद्रकांत जडगे,डॉ.हमीद दाभोलकर डॉ.अशोक थोरात, आझाद कॉलेजचा स्टाफ, अक्षय जाधव, नरेंद्र रोकडे,सोनंम पोवार, शुभम जितुरी, विशाल पोखरकर, समता प्रतिष्ठान मळोली येथील कार्यकर्ते भीमराव मोरे, तुकाराम लोखंडे,सम्यक खवळे, डॉ.आबासाहेब सरवदे, हनुमंत सरवदे, मुकुंद सरवदे, डॉ.संजयकुमार सरगडे, लुंबिनी संघ सातारा येथील डॉ.गोरख बनसोडे,शिक्षक हितकारिणी संघटनेचे डॉ.प्रकाश पवार डॉ.गीता शिंदे व सहकारी  इत्यादींनी त्याचे व पालकांचे अभिनंदन केले.

No comments