Breaking News

दुधेबावी येथे दि.१२ ते १६ मे दरम्यान संत गाडगेबाबा व्याख्यानमाला

Sant Gadge Baba Lecture Series at Dudhebavi from 12th to 16th May

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  - दुधेबावी ता. फलटण येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने दुधेबावी फेस्टिव्हल अंतर्गत  संत गाडगेबाबा व्याख्यानमाला गुरुवार दि. १२ मे  ते सोमवार दि.१६ मे दरम्यान रोज सायंकाळी ७ वाजता होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर, व्याख्यान माला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी दिली. 

    २० वर्ष सातत्य ठेवणाऱ्या   व्याख्यानमालेचे उद्घाटन जलसंपदा विभागाच्या अव्वर सचिव सौ.विशाखा आढाव - भोने यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे प्राथमिक विभागाचे  शिक्षण उपसंचालक देविदास कुलाळ, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष  रविंद्र बेडकिहाळ, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर ,उजणी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, नातेपुतेचे सहाय्यक  पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर , पोलिस पाटील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर , माजी पंचायत समिती सदस्य सुभाषराव सोनवलकर ,  अधिक्षक अभियंता दिनकरराव सोनवलकर ,सरपंच मधुकर वावरे, उपसरपंच भाऊसाहेब मोरे,  उपस्थित राहणार आहेत.                      

    दि.१२ मे रोजी युवा व्याख्याते, समाजपरिवर्तनकार, प्रा. वसंतराव हंकारे सांगली यांचे महापुरूषांच्या विचारांची धग या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्ष स्थानी सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मनोज जाधव आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून फलटण तालुका पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्रा. रमेश आढाव  उपस्थित राहणार आहेत.          

    शुक्रवार दि. १३ मे रोजी सौ. करिश्मा आटोळे - गावडे यांचे आई घराचे मांगल्य वडील घराचे   आस्तित्व या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्ष स्थानी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रूग्णालय सातारचे सिव्हील सर्जन डॉ.सुभाष  चव्हाण आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुभाष भांबुरे ,सामाजिक कार्यकर्ते  किरण सोनवलकर ,दादा मदने  उपस्थित राहणार आहेत. 

    शनिवार दि.१४ रोजी पाठ्यपुस्तकातील प्रसिद्ध कवी हणमंत चांदगुडे यांचे कविता तुमच्या आमच्या जगण्याची या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी फलटणचे तहसिलदार समीर यादव आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार किरण बोळे ,महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कस फेडरेशनचे संयुक्त सचिव नानासाहेब सोनवलकर उपस्थित राहणार आहेत. रविवार दि.१५ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रित सदस्य ,प्रसिद्ध कथाकथनकार प्रा. रविंद्र कोकरे यांचे व्यथा माणसाच्या कथा जगण्याच्या या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी मुंबईचे आयकर विभागाचे सहआयुक्त तुषार मोहिते आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार यशवंत खलाटे, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे संचालक भानुदास सोनवलकर  उपस्थित राहणार आहेत. 

    सोमवार दि. १६ रोजी चांडाळ चौकडीच्या करामती या प्रसिद्ध वेबसिरीजचे दिग्दर्शक रामभाऊ जगताप यांचे कलाक्षेत्रातील युवकांपुढील आवाहने या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी फलटणचे सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक  सुनिल धायगुडे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार नसीर शिकलगार, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दत्तात्रय दडस उपस्थित राहणार आहेत. या ज्ञानशृंखलेस उपस्थित राहण्याचे आवाहन  प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे,सचिव विठ्ठल सोनवलकर ,कार्याध्यक्ष संतोष भांड,खजिनदार डॉ. युवराज एकळ, सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर ,शेखर चांगण,कांता सोनवलकर  यांनी केले आहे.

No comments