Breaking News

प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांचा भिमस्फूर्ती पुरस्काराने गौरव

शिवाजीराव जगताप यांना पुरस्कार देताना मिलिंद अहिवळे त्यावेळी विकी काकडे, शाम आहिवळे, ॲड.रोहित अहिवळे, कुमार अहिवळे व अन्य

Dr. Shivajirao Jagtap honored with Bhimsfurti Award

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -:  जागतीक महामारी कोरोना काळात नागरिकांना सुरक्षित ठेवत फलटण शहर, तालुका आणि उपविभागात आदर्श काम केल्याबद्दल प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप  यांना भिमस्फूर्ती पुरस्काराने गौरवण्यात आले.

       सन २०१० पासून अखंडपने सुरू असलेली आंबेडकरी प्रजा परिषद समाजमध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींचा गौरव करीत भिमस्फूर्ती पुरस्कार देत आहे.

         यावेळी प्रांताधिकारी म्हणाले, अनेक संस्था उदयास येतात, चांगले काम करतात, पण थोड्याच काळातच ठप्प होताना दिसतात. मात्र फलटणमध्ये एका दशकाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या आंबेडकरी प्रजा परिषदेचे कार्य कौतुकास्पद आहे. 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर इग्नायटेड मिशन, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती आणि डाॅ. बाबासाहेब विचार प्रसारक मंडळाचे सामाजिक कार्यासाठी  समर्पित वृत्तीने सहभागी असलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन व्यक्त करुन  फलटणच्या आंबेडकरी चळवळीच्या व्यापक कार्याची माहिती सर्वदूर पसरली असून, असेच आदर्श काम पुढे चालू राहावे अशी अपेक्षा शिवाजीराव जगताप यांनी यावेळी व्यक्त केली. 

           यावेळी भीमस्फूर्ती पुरस्कार समितीचे सचिव मिलिंद अहिवळे आणि भीम जयंती मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान केला. याप्रसंगी योगेश धेंडे, लक्ष्मण अहिवळे, कुमार अहिवळे,  शाम अहिवळे, ॲड. रोहित अहिवळे, गौतम अहिवळे, सुशांत काकडे, विकी काकडे, अक्षय काकडे, केतन सोरटे, निखिल अहिवळे, सुशांत अहिवळे, उमेश काकडे, आदींची उपस्थिती होती.

No comments