Breaking News

सोन्या - चांदीच्या दुकानातून २ लाख ९२ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण लंपास

Theft of gold necklace worth Rs 2 lakh 92 thousand 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  - शांतीकाका सराफ अँण्ड सन्स, पृथ्वी चौक फलटण या सोन्या-चांदीच्या दुकानातून, पाडव्याच्या दिवशी दोन अनोळखी महिला व एका पुरुषाने, सुमारे २ लाख ९२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण हातचालाखीने लपवून दुकानातून लंपास केले आहे. दरम्यान सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाली असून, त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास चालू आहे.

    या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दि. २ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२.४० वाजण्याच्या दरम्यान मास्क परिधान केलेल्या दोन अनोळखी महिला व एका पुरुषाने, शांतीकाका सराफ अँण्ड सन्स, पृथ्वी चौक फलटण या सोन्या-चांदीच्या दुकानात येऊन, सोन्याचे गंठण घेण्याचा बहाणा करून, सेल्समन यांना गंठनच्या डिझाईन दाखविण्यास सांगितले व सेल्समनची नजर चुकवून, सुमारे २ लाख ९२ हजार रूपये किंमतीचे एक सोन्याचे गंठण हातचालाखीने लपवून दुकानातून घेवून जावून फसवणूक केली असल्याची फिर्याद नितीन गांधी यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.

     सीसीटीव्ही फुटेज मध्ये दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी महिला व एक पुरुष त्यांचे वर्णन दोन्ही महिला अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाच्या अंगात लाल व हिरव्या रंगाची साड्या घातलेल्या तोंडावर मास्क घातलेले व अनोळखी इसम अंदाजे २८ वर्षे वयाचा तोंडावर मास्क घातलेले व पिवळ्या रंगाचा फुल शर्ट व निळसर पँन्ट तसेच डोक्याला टोपी घातलेली दिसत आहे. यांनी दुकानात येऊन हातचलाखीने सहा तोळ्याचे गंठण लंपास केलेले दिसून येत आहे.  त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.

No comments