Breaking News

फलटण तालुक्यात सौनिक स्कुल सुरू करण्याची सरंक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे खासदार रणजितसिंह यांची मागणी

MP Ranjitsingh's demand to Defense Minister Rajnath Singh to start Sainik School in Phaltan taluka

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ एप्रिल - फलटण तालुक्यात सौनिक स्कुल सुरू करण्याची मागणी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

    नवी दिल्ली येथे केंद्रीयमंत्री राजनाथसिंह यांना भेटुन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ही मागणी केली आहे. यावेळी माण-खटाव चे आमदार जयकुमार गोरे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार समाधान आवताडे व इतर मान्यवर उपस्थीत होते.

    भारत सरकारने देशात नवीन १०० सैनिक स्कुल सुरू करण्याचे नियोजन केले असुन माढा मतदारसंघात २५ लाख लोकसंख्या असुन, सातारा व सोलापुर या दोन्ही जिल्हयात हा मतदासंघ विभागला आहे. सातारा जिल्हा हा क्रांतीकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील युवक देश प्रेमाने प्रेरीत असुन हजारोच्या संख्येने लोक देशसेवेत सामील आहेत, त्यामुळे येथील युवक सैन्य भरतीसाठी कायमच अग्रेसर असतो. अशा युवकांना योग्य प्रशिक्षण व शिक्षण मिळण्यासाठी, माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यात सैनिक स्कुल व्हावे, अशी मागणी माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय सरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचेकडे केली आहे.

No comments