फलटण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी बापुराव गावडे यांची नियुक्ती
![]() |
| बापूराव गावडे यांना नियुक्ती पत्र देवून शुभेच्छा देताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर वगैरे |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) : तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी व समाजातील गरीब व गरजू घटकांना न्याय मिळवून देणारी समिती म्हणून ज्या समितीचा उल्लेख केला जातो अशा फलटण तालुका संजय गांधी स्वावलंबन व निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी खटकेवस्ती ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच बापूराव दत्तात्रय गावडे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी सातारा यांनी केली आहे.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज सदर नियुक्ती पत्र बापूराव गावडे यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी निंभोरे गावचे सरपंच मुकुंदराव रणवरे, सनी शिंदे उपस्थित होते.
ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदर नियुक्तीसाठी नाव सुचवितांना आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे, त्या विश्वासास पात्र राहुन आ. दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समिती माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत रामराजे यांना अभिप्रेत असे काम करेन, संजय गांधी निराधार व अनुदान योजना समितीच्या माध्यमातून तालुक्यातील दिव्यांग, निराधार, विधवा, घटस्फोटीत महिला, पात्र लाभार्थी पुरुष महिला, मुले यांना शासकीय नियमानुसार योग्य ती मदत करण्याची ग्वाही यावेळी बापूराव गावडे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी सातारा यांनी घोषीत केलेल्या फलटण तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्षपदी बापूराव गावडे, सदस्यपदी भारत माधव अहिवळे फलटण, सौ.अवंतिका विक्रमसिंह जाधव हणमंतवाडी, दिलीप सर्जेराव अडसूळ माळवाडी तरडगाव, विकास राजाराम नाळे मठाचीवाडी, सदाशिव बापूराव जगदाळे सगुणामाता नगर फलटण, प्रतापसिंह सुभाषराव निंबाळकर विद्यानगर फलटण, दत्तात्रय कांतीलाल गुंजवटे सोमंथळी, ज्ञानेश्वर रमेश पवार वाघोशी, अर्जुन कोंडीबा रुपनवर कोळकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फलटण पंचायत समिती गटविकास अधिकारी पदसिद्ध सदस्य असून तहसीलदार फलटण या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
या नियुक्तीबद्दल बापूराव गावडे यांच्यासह सर्व सदस्यांचे अभिनंदन करुन अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments