खासदार कच्च्या मातीचा पुतळा नाही; कुणाही आंडू पांडूने माझा नाद करू नये - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
![]() |
| शायनिंग महाराष्ट्र या महाप्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर |
MP is not a clay statue;MP Ranjitsingh Naik Nimbalkar warned that no one should argue with me
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ मार्च - कुणी कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तरीही, मुद्दई लाख बुरा चाहे, तो क्या होता है। वही होता है, जो मंजूरे ख़ुदा होता है। ही हिंदीतील कहावत ऐकवत, अडचणीत आणणाऱ्यांना आमच्याबाबत कोणी कितीही ग्रहण लावायचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही. ज्याप्रमाणे निरा कालव्याचे पाणी आम्ही बारामती कडून इकडे वळवले, त्यावेळी जयकुमार गोरे व मला भरपूर अडचणी आणल्या गेल्या, त्यातून मी भरपूर शिकलो आहे. बारामतीला जाणारे पाणी आम्ही शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी इकडे वळवले, हा जर गुन्हा असेल तर, आम्हाला जनता देईल ती शिक्षा भोगण्यास आम्ही तयार आहोत, परंतु शेतकऱ्यांसाठी शिक्षाच नाहीतर रक्ताचा शेवटचा थेंब देखील देण्याची आपली तयारी असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगतानाच, कुणी कितीही लांछन लावली किंवा आरोप केले तरीही आम्ही थांबणार नाही. कोणी जर असे समजत असेल खासदाराला डांबू शकू, तर, 'हा खासदार कच्च्या मातीचा पुतळा नाही, रणजितसिंह नाईक निंबाळकर आयुष्यतील 20 ते 25 वर्षांचा आणि दोन पिढ्यांचा संघर्ष करून, इथंपर्यंत आला आहे, आज लाखो नागरिकांनी माझ्या पाठीमागे शक्ती व आशीर्वाद उभे केले आहेत, जे सत्य आहे ते लवकरच बाहेर येईल, आणि जो माणूस शरद पवार, रामराजे यांच्याकडून हारला नाही, तर आंडू पांडू कडून काय हारेल! कोणाही आंडू पांडूने माझा नाद करू नये असा खणखणीत इशारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिला.
शायनिंग महाराष्ट्र २०२२ या महाप्रदर्शनाच्या समारोप समारंभ व भाजपाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरुन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय संचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान उपस्थित होते. समारंभास माणचे आमदार व भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित सातारा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर, सोलापूर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्रीकांत देशमुख, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक अनुप शहा, सुशांत निंबाळकर, नानासो इवरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व केंद्र, राज्य सरकारच्या विविध खात्यांचे अधिकारी तसेच स्वराज फौंडेशन व सांसा फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांसाठी योजलेल्या सर्व योजनांची माहिती नागरिकांना घेता आली. केंद्र सरकारच्या आयुष, शेती, पोस्ट, दूरध्वनी, नाबार्ड, वैज्ञानिक, ग्रामोद्योग या सर्वच क्षेत्रातील योजनांची माहिती नागरिकांना घेता यावी यासाठीच आपण या प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. मी खासदार झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्र्यांनी मला सहकार्य करुन, माढा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावलेले आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून माढा मतदारसंघात हायवे, आंतरराज्य रस्ते, बुलेट ट्रेन व इतर रेल्वे मार्ग मंजूर झाले आहेत. त्यामुळे या भागाचा विकास कोणीही रोखू शकत नाही. माढा मतदार संघात इतके काम झाले आहे की, भविष्यात माढा मतदारसंघ रोल मॉडेल म्हणून पुढे येईल असे स्पष्ट मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रदर्शित केले.

No comments