सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यशस्वी मुलांच्या मातांचा आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मान
| आदर्श माता पुरस्कार प्रदान करताना श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सौ प्रगतीताई कापसे, सौ. वैशालिताई अहिवळे, प्रतिभाताई शिंदे,जाधववाडी सरपंच सीमा गायकवाड व सौ. सुपर्णा अहिवळे |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मुले - मुली शिकुन डॅाक्टर, वकिल, इंजिनिअर, शासकीय अधिकारी, उच्च पदावर जातात, त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र सत्कार होत रहातात, पण ज्या मातेने, या मुलांना घडविले, त्यांना संस्कारी बनवले, त्यांना उच्च शिक्षित केले त्या आईचा सन्मान व्हायला पाहिजे या सौ. सुपर्णा सनी अहिवळे यांच्या संकल्पनेतून सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महिला दिनी यशस्वी मुलां-मुलींच्या मातांचा आदर्श माता पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
यावर्षी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महिला दिनी १६ मातांचा गौरव करण्यात आला. या सर्व मातांना, मा. नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, दिपालीताई निंबाळकर, सौ प्रगतीताई कापसे, सौ. वैशालिताई अहिवळे, प्रतिभाताई शिंदे यांच्या हस्ते, आदर्श माता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आदर्श माता पुरस्कारामध्ये १) मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी अमितकुमार अनिल अहिवळे यांच्या आई कांता अनिल अहिवळे २) डॉ. दिपाली आबाजी गायकवाड यांच्या आई तथा जाधववाडी सरपंच सिमा आबाजी गायकवाड ३) डॉ. निलेश आनंद गायकवाड यांच्या आई सुनिता आनंद गायकवाड ४) सेट परीक्षेत यश मिळवलेले स्वरूप आनंद अहिवळे यांच्या आई जयश्री संजय अहिवळे ५) सेट परीक्षेत यश मिळवलेले अक्षय महादेव अहिवळे तसेच ज्ञानरत्न महादेव अहिवळे वकील यांच्या आई राजश्री महादेव अहिवळे ६) कृषी अधिकारी दिव्या दिलीप मोरे यांच्या आई पद्मिनी दिलीप मोरे ७) उद्योजक सागर चंद्रकांत अहिवळे यांच्या आई सुषमा चंद्रकांत अहिवळे ८) तलाठी लक्ष्मण सुभाष अहिवळे यांच्या आई जयश्री सुभाष अहिवळे ९) आय.सी.आय.सी. आय बँक मनेजर विठ्ठल चंद्रकांत शेलार यांच्या आई कुसुम रामचंद्र शेलार १०) पंजाब नॅशनल बँकेचे मार्केटींग ऑफिसर संदिप बाबुराव मोरे यांच्या आई रमाबाई बाबु मोरे ११) पंजाब नॅशनल बँक अधिकारी प्रतिक्षा गौतम काकडे यांच्या आई हर्षदा गौतम काकडे १२) तेजस अनिल मोरे वकील यांच्या आई नलिनी अनिल मोरे १३) प्रेम आदेश अहिवळे वकिल तसेच चांडाळ चौकडीच्या करामती मधील कलाकार अमिर आदेश अहिवळे यांच्या आई वैशाली आदेश अहिवळे १४) आशा महादेव काकडे वकील यांच्या आई लक्ष्मी महादेव काकडे १५) टी-२० महाराष्ट्र संघातील खेळाडू मुस्ताक जादेव कोतवाल यांच्या आई रझिया जावेद कोतवाल १६) टी-२० महाराष्ट्र संघातील खेळाडू केतन शरद अहिवळे यांच्या आई योगिता शरद अहिवळे या मातांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
No comments