गॅलेक्सीला बँको ब्ल्यु रिबन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान ; गॅलेक्सीला मिळालेला पुरस्कार म्हणजे गॅलेक्सीच्या कष्टाची पोहचपावती - सचिन यादव
![]() |
| बँको ब्ल्यु पुरस्कार स्वीकारताना गॅलेक्सीचे डायरेक्टर सचिन यादव व पदाधिकारी |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - लोणावळा येथे दिनांक १४ मार्च २०२२ रोजी "बँको ब्लू रिबन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा" संपन्न झाला, या सोहळ्यात गॅलेक्सी को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. फलटण ला बँको ब्लू रिबन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गॅलेक्सी ला मिळालेला पुरस्कार म्हणजे गॅलेक्सीच्या संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्या कष्टाची पोहचपावती आहे. या पुरस्काराने गॅलेक्सी बँकेकडे राज्याचं लक्ष राहणार असल्यामुळे, संस्थेची जबाबदारी वाढली असून, यापुढील काळातही गॅलेक्सी अशाच प्रकारे वाटचाल करेल, तसेच नागरिकांना अधिक सोयी सुविधा पुरवण्याकडे लक्ष देणार असल्याचे डायरेक्टर श्री सचिन यादव यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले.
गॅलेक्सी ला अत्यंत कमी कालावधी मध्ये बँको ब्ल्यु रिबन पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यामुळे, कार्यक्रम स्थळी अनेक संस्थांनी व मान्यवरांनी संस्थेचे डायरेक्टर सचिन यादव यांची भेट घेऊन या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.
३ वर्षात सुमारे १५ कोटी च्या सुरक्षित ठेवी, सुरक्षित कर्ज वाटप, योग्य गुंतवणूक, नवनवीन योजना ऑनलाईन सेवा, मोबाईल बँकिंग सुविधा संस्थेकडून बँकच्या सेवा देणे, अश्या विविध निकषांमधून के बी उद्योग समूह संचलित डायरेक्टर, संस्थापक-चेअरमन, श्री. सचिन सर यांच्या नेतृत्वात काम करीत असणाऱ्या गॅलेक्सी को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. फलटण ला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

No comments