Breaking News

दिगंबर आगवणे यांची व्हॉटसअ‍ॅप वर बदनामी ; चौघांच्या विरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा

Digambar Aagwane defamed on WhatsApp, charges filed against four under Atrocities Act

   फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ६ मार्च - दिगंबर आगवणे यांचा चारचौघात पाणउतारा करण्याचे उद्देशाने, फलटण शहरातील व तालुक्यातील व्हॉटसअ‍ॅप  ग्रुपवरती बदनामी केल्या प्रकरणी, चौघांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दिगंबर आगवणे यांनी दिनांक १ मार्च २०२२ रोजी  दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान पत्रकार परिषद घेवुन, त्यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आर्थिक फसवणुक केल्याची माहिती दिल्याचा, राग मनात धरून, चिडुन जाऊन जगदीश ऊर्फ बाळासाहेब कदम, स्वागत काशीद व वसीम इनामदार व इतर एक यांनी दिगंबर आगवणे यांचा, चारचौघात पाणउतारा करण्याच्या उद्देशाने, दिनांक २ मार्च २०२२  रोजी अनुक्रमे  १२.५५, ९.२२ व १२.५९ वाजताचे सुमारास, फलटण शहरातील व तालुक्यातील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर, सांगायलाही लाज वाटेल असे शब्द वापरून, दिगंबर आगवणे यांची बदनामी करणारा मजकुर प्रसिध्द केला असल्याची फिर्याद दिगंबर आगवणे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे. त्या अनुषंगाने वरील संशयितांविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट  व भादविसं कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments