केंद्रीय राज्यमंत्री चौहान यांच्या उपस्थितीत पदाधिकारी सत्कार व शायनिंग महाराष्ट्र प्रदर्शनाचा समारोप
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २६ मार्च - रविवारी दि २७ रोजी सकाळी १० वाजता शायनिंग महाराष्ट्र महाप्रदर्शनाचा समारोप समारंभ व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ केंद्रीय राज्यमंत्री देवुसिंग चौहान यांच्या शुभहस्ते व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर अध्यक्षतेखाली व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होत आहे.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून जाधववाडी ता.फलटण येथील शुभारंभ लॉन्स येथे केंद्रीय मंत्रालयातील विविध विभागांचे भव्य प्रदर्शन गेली दोन दिवस सुरु असून त्याचा समारोप केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंग चौहान यांच्या शुभहस्ते व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अध्यक्षतेखाली तसेच आमदार व सातारा नूतन जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे,आमदार राम सातपुते, विक्रम पावसकर राज्य सरचिटणीस भाजपा, समशेरसिंह नाईक-निंबाळकर मा.विरोधी पक्षनेते फ. न. प, ऍड. जिजामाला नाईक निंबाळकर ( मा जि. प सदस्य),श्रीकांत देशमुख जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा भाजपा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच भाजपाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी आमदार जयकुमार गोरे यांची, विक्रम पावसकर यांची राज्य सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी महाराष्ट्र मध्ये भाजपाचे सर्वात जास्त ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक निवडून आणल्याबद्दल या सर्वांचा सत्कार केंद्रीय राज्यमंत्री यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments