Breaking News

फलटणची श्रीराम रथ यात्रा रद्द ; भाविकांनी रथाच्या दर्शनासाठी येवु नये प्रशासनाने केले आवाहन

Shriram Rath Yatra of Phaltan canceled

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ डिसेंबर - फलटण शहरातील तसचे तालुक्यातील सर्व भाविकांना/नागरीकांना कळविण्यात येते की, सालाबाद प्रमाणे दि.०५/१२/२०२१ रोजी प्रभु श्री रामरथ यात्रा तिथीनुसार आलेली असुन, सदरची यात्रा ही, सध्या कोरोना विषाणुची साथ मोठया प्रमाणात वाढत असल्याने रद्द करण्यात आलेली आहे. तसेच सातारा जिल्हयात मा. जिल्हादंडाधिकारी सो, सातारा यांच्याकडील आदेशान्वये सातारा जिल्हयात मा. जिल्हादंडाधिकरी कार्यालय सांतारा यांचेकडी क्र. डिसी / एमएजी/२/ एसआर/८६/२०२१ दिनांक २९/११/२०२१ अन्वये क्रिमीनल प्रोसिजर कोड कलम १९७३ चे कलम १४४ अन्वये संचारबंदी आदेश जारी केले आहेत.

    नमुद अनुषंगाने मा. उपविभीय अधिकारी सो, फलटण विभाग फलटण यांनी दिनांक ५/१२/२०२१ रोजी यात्रा कालावधिमध्ये क्रिमीनल प्रोसिजर कोड कलम १९७३ चे कलम १४४ अन्वये संचारबंदी आदेश जारी करुन, प्रभु श्री रामरथ यात्रा रद्द करण्यात आली असले बाबत जाहिर केले आहे. तरी दिनांक ५/१२/२०२१ रोजी श्री रामरथ यात्रा रद्द केली असल्याने, कोणीही भाविक रथाच्या दर्शनासाठी येणार नाही. मंदिरा मधील दर्शन चालु असुन, मंदिर परिसरात जमावाने / गर्दी करुन येण्यास बंदी घातलेली आहे, तसेच मंदिरा मधील दर्शन हे कोरोना व्हॉक्सीनचे दोन्ही डोस झालेल्या भाविकांना / नागरीकांना घेता येणार असल्याने दर्शनाकरीता येताना दोन्ही डोस झाल्याचे प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत घेवुन येणे अनिवार्य आहे.

    तसेच दिनांक ५/१२/२०२१ रोजी श्री राम मंदिर ट्रस्ट यांनी भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय केली असल्याने भाविकांनी/नागरीकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभा घ्यावा ही सर्व प्रशासनाचे वतीने विनंती करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी कळविले आहे.

No comments