Breaking News

श्रीमंत रामराजेंना रुग्णालयातून डिस्चार्ज ; उद्यापासून कामकाज सुरू

Shrimant Ramaraje discharged from hospital; Work will start from tomorrow

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ नोव्हेंबर -  विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना पुणे येथील लोकमान्य रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, उद्या ते फलटणला येत आहेत.  आजारातून बरे होताच क्षणाचीही उसंत न घेता, कामकाज  सुरू करणार आहेत.  उद्या मंगळवारी जिल्हा बँक निवडणूकीच्या  बैठकीला श्रीमंत रामराजे  हजर राहणार आहेत. तर बुधवारी सातारा येथे सभेला उपस्थित राहणार आहेत.

    श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटस द्वारे  डिस्चार्ज मिळाला असल्याचे सांगतानाच जनतेला संदेश दिला असून त्यामध्ये असे म्हटले आहे की, आपल्या सर्वांच्या आशीर्वादांमुळे मी दवाखान्यातून घरी आलो आहे. लवकरच आपल्या सेवेला हजर होणार आहे.

No comments