Breaking News

सुदामराव मांढरे : कार्यशील नेतृत्व

Sudamarao Mandhare: Working leadership

    श्री सुदामराव नारायणराव मांढरे उर्फ अप्पा यांचा ७५ वा वाढदिवस म्हणजेच अमृत महोत्सव आज  दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी  सायंकाळी ६  वाजता, आमदार दीपक चव्हाण व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर  यांच्या  उपस्थित संपन्न होत आहे. 

    मांढरे कुटुंब हे मूळचे वाई तालुक्यातील मांढरदेव येथील आहे.   श्रीमंत मालोजीराजे महाराज साहेब यांनी सुदामराव यांचे वडील नारायणराव मांढरे यांना राजकारणात सक्रिय केले आणि मांढरे परिवारास फलटणमध्ये मानाचे स्थान दिले. सुदामरावअप्पा यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या दोन्ही बंधुसह राजकारणात प्रवेश केला. 

    फलटण नगर परिषदेत सुदामराव मांढरे यांनी 25 वर्ष नगरसेवक पद भूषवले, या कार्यकाळात त्यांनी विविध समित्यांच्या चेअरमनपदी काम करून, अनेक विकास कामे मार्गी लावली. शुक्रवार पेठ तालीम, रविवार पेठ तालीम उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. पाणीपुरवठा सभापती असताना मलठण मधील पाण्याची टाकी उभारण्यातही  त्यांचे योगदान आहे. शुक्रवार पेठ येथील स्वामी समर्थ मंदिराचा पूल, विविध रस्ते, शौचालये अशी विविध कामे सुदामराव मांढरे यांनी नगरसेवक पदाच्या कार्यकालात केलेली आहेत. नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यात तसेच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात सुदामराव मांढरे हे पुढाकार घेत असतात. त्यामुळेच या कार्यशील नेतृत्वाला नागरिकांनी पंचवीस वर्ष नगरसेवक पदी निवडुन दिले.

    शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे 15 वर्षे अध्यक्ष, झुंजार गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्षपदाची धुराही सुदामरावअप्पा यांनी यशस्वीपणे सांभाळली. सुदामराव यांचा स्वभाव मनमोकळा व रोखठोक असल्याने त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. सुदामराव मांढरे यांनी राजकारण व समाजकारणात सक्रिय असतानाच  अतिथी या रुपाने हॉटेल व्यवसायांमध्ये तेवढ्याच जिद्दीने व कष्टाने खूप मोठी प्रगती केली.  व आपला हॉटेल व्यवसाय अखंडितपणे चालू ठेवून नावरूपास आणला. अशा या नेतृत्वाचा आज महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे सायंकाळी ६ वाजता, ७५ वा वाढदिवस संपन्न होत आहे,  त्या निमित्ताने अप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

@ ॲड. रोहित शाम अहिवळे 

No comments