खुंटे येथील युवक बेपत्ता
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा ) - आनंदनगर, खुंटे तालुका फलटण येथून 19 वर्षीय युवक कामाला जातो असे सांगून घर सोडून निघून गेला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 9/8/2021 राेजी स.10.00 वा. मौजे आनंदनगर खुंटे ता. फलटण येथील रहाते घरातून साै.माया दिलीप शिंदे यांचा धाकटा मुलगा संजय दिलीप शिंदे वय 19 वर्षे माे.7498263901/9699951696 हा जितेंद्र मोरे रा. खुंटे तालुका फलटण यांच्याकडे कामाला जातो असे सांगून निघून गेला, तो अद्याप पर्यंत घरी आला नसल्याची मिसिंग तक्रार साै.माया दिलीप शिंदे यांनी दिली आहे.
अधिक तपास सहायक फौजदार यादव हे करीत आहेत.
No comments