Breaking News

फरशी विक्री दुकानाच्या ड्रॉवर मधुन 60 हजार रुपयांची चोरी

Theft of Rs. 60,000 from the drawer of the floor sale shop

    फलटण दि. 8 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - गोविंद दुध डेअरी शेजारी फलटण - पंढरपुर रोडलगत असणाऱ्या मार्बल - फरशी विक्री दुकानाचे मालक व कामगार, माल देण्यासाठी गोडाऊन मध्ये गेले असता,  अज्ञात चोरट्याने दुकानाच्या उघड्या दरवाज्यातुन आत येवुन,  दुकानामधील काउंटरच्या ड्रॉवर मधुन  60,000/- रूपये चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात  चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    अधिक वृत्त असे, तेजाराम संग्रामराव चौधरी  रा.भडकमकर नगर फलटण यांचे आशापुरी नावाचे मार्बल- फरशी विक्रीचे दुकान, गोविंद दुध डेअरीशेजारी, फलटण - पंढरपुर रोडलगत आहे. दिनांक 5/9/2021 रोजी सायं.5.00 वाजण्याच्या सुमारास, तेजाराम संग्रामराव चौधरी व कामगार मार्बल फरशीचे दुकानाचा दरवाजा उघडा ठेवुन, दुकानाशेजारी शंभर फुटावर असलेल्या गोडाउन मध्ये  मार्बल फरशी ग्राहकांच्या टँम्पोमध्ये भरत होते.त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानाच्या उघड्या दरवाज्यातुन आत येवुन, दुकानामधील काउंटरच्या ड्रॉवर मधुन 60,000/- रूपये संमती शिवाय मुद्दाम लबाडीने चोरून नेले असल्याची फिर्याद तेजाराम संग्रामराव चौधरी यांनी दिली आहे.

No comments