Breaking News

तरडगावच्या लेबर कॉन्ट्रॅक्टरला लुटले ; 5 लाख 9 हजार रुपयांची कॅश लंपास

Robbed a labor contractor in Tardgaon; Theft of 5 lakh 9 thousand rupees

    लोणंद दि.१३ सप्टेंबर ( गंधवार्ता वृत्तसेवा ) - लोणंद ते फलटण रोडवरुन परहर फाटा पास करुन मग्नेशिया कंपनीकडे कारने जात असताना, तरडगाव येथील लेबर कॉन्ट्रॅक्टरची चारचाकी गाडी अडवून, कोयत्याचा धाक दाखवून, गाडीत असणारी ५ लाख ९ हजार रुपयांची कॅश व मोबाईल आणि गाडीची चावी पळवून नेल्या प्रकरणी अज्ञात ५ जणांच्या विरोधात लोणंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अधिक वृत्त असे, कृष्णांत हरीदास गायकवाड रा. तरडगाव ता.फलटण हे लेबर कॉन्ट्रॅक्टर, मॅग्नेशिया कंपनीत लेबर पुरवण्याचे काम करतात. दिनांक ९ सप्टेंबर २०२१ रोजी लेबर लोकांचे पेमेंट करण्याकरिता त्यांनी बँकेतून कॅश काढली व त्यातील ३ लाख ९१ हजार रुपये लोणंद येथील रेल्वे पुलावर जवळ राहणाऱ्या,  शिवराज लोधी यांना दिले.  उर्वरित ५ लाख ९ हजार रुपये  कॅश आपल्या  न्यु क्रेएटा नंबर एमएच १२ टी के ७३२१ या चारचाकी गाडी मध्ये घेऊन, ते मग्नेशिया कंपनीकडे गेले. त्यानंतर लोणंद ते फलटण रोडवरुन परहर फाटा पास करुन मग्नेशिया कंपनीकडे कारने जात असताना, साधारण ५.२० वाजण्याचे सुमारास, त्यांची कार  रेल्वे पुलाजवळ आली. तेथे पुलावर सिमेंट कट्टाजवळ गाडी स्लो केली. त्यावेळी पुलावर एक लाल काळे रंगाचे पल्सर व दुसरी काळे व लाल रंगाचे पॅशन मोटार सायकल साईडला लावुन २२ ते २७ वयोगटातील पाचजण उभे होते,  त्यांचेपैकी एकाने  गाडीजवळ उजवे बाजुस गेला व अचानक  हातातील लोखंडी कोयत्याचा धाक दाखवुन ड्रायव्हर बाजुचे काचेवर मारुन काच फोडली,  त्यावेळी त्याच्या बरोबर असणारे इतर चौघेजन कारजवळ येवु लागताच, लेबर कॉन्ट्रॅक्टर डावे बाजुचा दरवाजा उघडुन कार मधुन बाहेर पडुन कंपनीचे दिशेने पळाले.  त्यावेळी त्या इसमानी गाडीतील कॅश ठेवलेली काळ्या रंगाची बॅग, मोबाईल व कारची चावी काढुन घेवुन ते सर्वजन दोन मोटार सायकलवरुन,  लोणंद ते फलटण जाणाऱ्या रोड बाजुकडे निघून गेले. या लुटीमध्ये ५ लाख ९ हजार रुपयांची रोख रक्कम  व २५ हजार रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल हँडसेट आणि  न्यु क्रेएटा गाडीची रिमोटची चावी, अनोळखी पाच चोरटयानी जबरीने चोरुन नेली असल्याची फिर्याद कृष्णांत हरीदास गायकवाड यांनी दिली आहे.

No comments