कमलाकर चंदर काकडे यांचे दुःखद निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ सप्टेंबर - निवृत्त फौजी व माहिती जनसंपर्क कार्यालयाचे निवृत्त कर्मचारी कमलाकर चंदर काकडे (बाबुजी) यांचे दि. 08 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11:30 वा. वृध्दपकाळाने दु:खद् निधन झाले आहे. त्यांच्यावर फलटण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कमलाकर काकडे हे शिस्तप्रिय होते. त्यांनी भारतीय सेनेत 18 वर्षे सेवा बजावून देशसेवा केली. निवृत्तीनंतर माहिती जनसंपर्क कार्यालय येथे प्रशासकीय सेवेत ते कार्यरत होते. कमलाकर काकडे यांनी आंबेडकरी चळवळीत देखील योगदान दिले आहे. समाजाच्या प्रश्नामध्ये तसेच सामाजिक कार्यात ते अग्रेसर असायचे, जयंती मंडळातही ते सक्रिय असायचे. त्यांच्या पश्चात मुली, जावई, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
No comments