Breaking News

सातारा जिल्ह्यात 193 कोरोनाबाधित ; 3 बाधिताचा मृत्यू

Corona virus Satara District updates :  3 died and 193 corona positive

236 जणांना दिला आज डिस्चार्ज

    सातारा दि.11 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  193 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 3 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

    तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे.
    जावली 0 (9891), कराड 23 (38398), खंडाळा 5 (13965), खटाव 22 (24846), कोरेगांव 15 (21424), माण 17 (17276), महाबळेश्वर 4 (4625), पाटण 2 (10106), फलटण 46 (35840), सातारा 46 (50191), वाई 13 (15560) व इतर 0  (1972) असे  आज अखेर एकूण 244094 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  खटाव 1, माण 1 व सातारा  1 असे एकूण 3 असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6017 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

    जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत  236  जणांना  घरी सोडण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *एकूण नमूने – 1911168
*एकूण बाधित –244094
*घरी सोडण्यात आलेले 231964
*मृत्यू -6017
*उपचारार्थ रुग्ण--9055

No comments