कत्तलीसाठी चालवलेली जनावरे पकडली ; 13 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ सप्टेंबर - मौजे विडणी ता. फलटण गावच्या हद्दीत एका पिकअप गाडीत जनावरे भरून ती कत्तलीसाठी नेत असताना,फलटण ग्रामीण पोलिसांनी पकडून सुमारे 13 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फलटण येथील 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 8/9/2021 राेजी सायं 5.30 वा चे सुमारास, जाधववस्ती, अब्दागिरवाडी मौजे विडणी ता. फलटण गावच्या हद्दीत, 1) अझीम कुरेशी 2) इरफान कुरेशी 3) जावेद कुरेशी 4) तोफिक कुरेशी 5) दिशांत कुरेशी सर्व रा.कुरेशीनगर फलटण यांनी बेकायदा बिगर परवाना कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने जनावरे डांबून ठेवली व त्यांचे खाण्यापिण्याची कोणतीही सोय केली नव्हती तसेच सदरची जनावरे बेकायदा बिगर परवाना कत्तलीसाठी नेण्यासाठी पिकअप गाडीत भरून चालवली असताना ग्रामीण पोलिसांनी पकडली असून, त्यामध्ये 8 लाख 25 हजार रुपये किमतीची जनावरे व 5 लाख रुपये किमतीचे पिकप चार चाकी वाहन असे एकूण 13 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे हे करीत आहेत.
No comments