Breaking News

कमिन्स कंपनीत कामावर घेत नाही म्हणून एकास मारहाण

Beating one for not taking on a job in the Cummins company

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ सप्टेंबर -  कमिन्स कंपनी मध्ये ब्रेक दिलेला असताना, कामावर का घेत नाही या कारणावरून, बाळू बोबडे यांना काठीने  मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी  निंभोरे येथील स्वप्नील बनकर याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 3/9/2021राेजी सायंकाळी 6:00 वाजण्याच्या सुमारास माैजे सुरवडी  ता.फलटण  येथे, कमिन्स कंपनी मध्ये ब्रेक दिलेला असताना, कामावर का घेत नाही ? या कारणावरून स्वप्निल शंकर बनकर रा. निंभोरे तालुका फलटण याने  बाळू पोपट बोबडे रा. फडतरवाडी तालुका फलटण यांना काठीने  मारहाण करून जखमी केले आहे व शिवीगाळ दमदाटी केली असल्याची फिर्याद बाळू पोपट बोबडे यांनी दिली आहे.

    अधिक तपास पोलीस हवालदार टी.एम.सावंत हे करीत आहेत.

No comments