Breaking News

फलटण तालुक्यात 72 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहरात 15

72 corona affected in Phaltan taluka;  highest in city

     फलटण दि. 7 सप्टेंबर  2021  (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल  दि. 6 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 72 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 15 रुग्ण तर ग्रामीण भागात 57 रुग्ण सापडले आहेत. 

      काल  दि. 6 सप्टेंबर  2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 72 बाधित आहेत. 72 बाधित चाचण्यांमध्ये 13 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर.  चाचण्या तर  व 59 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना  चाचण्यांचा समावेश आहे.  यामध्ये फलटण शहर 15 तर ग्रामीण भागात 57 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात  घाडगेवाडी 3, ढवळ 3, कोळकी 3, माळेवाडी 3, मुंजवडी 2,  भिलकटी 1, शिंदेवाडी 4,  शिंदेनगर 1, विडणी 1, जिंती 1, निंभोरे 2, गीरवी 2,  शेरेवाडी 1, राजुरी 2, साखरवाडी 1, सांगवी 1, सोमंथळी 1, सुरवडी 3, दुधेबावी 1, वाठार निंबाळकर 1, वडले 1, तांबवे 1, ताथवडा 1, नांदल 4, आदर्की बुद्रुक 1, अलगुडे वाडी 1, गोखळी 1, पिंपरद 1, निंबळक 1,  भाडळी 1, पाडेगाव 1,साठे 1, सोनगाव 2,  बिजवडी तालुका माण 3 रुग्ण बाधित सापडले आहेत. 

No comments