फलटण तालुक्यात 91 कोरोना बाधित ; सर्वाधिक तरडगाव 7
फलटण दि. 8 सप्टेंबर 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 91 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 16 रुग्ण तर ग्रामीण भागात 75 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक तरडगाव येथे 7 तर त्या खालोखाल कोळकी येथे 6 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 91 बाधित आहेत. 91 बाधित चाचण्यांमध्ये 51 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 40 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 16 तर ग्रामीण भागात 75 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात तरडगाव 7, कोळकी 6, मुंजवडी 5, गुणवरे 4, हिंगणगाव 5, नांदल 5, कांबळेश्वर 2, टाकळवाडा 4, सांगवी 2, काळज 1, पाडेगाव 1, तिरकवाडी 1, जिंती 1, सोनगाव 1, पिंप्रद 4, खुंटे 1,शिंदेवाडी 1, सरडे 3, कुरवली खु 1, वाघोशी 1, साठे 2, चौधरवाडी 1, वाठार निंबाळकर 2, विडणी 3, वडले 1, ढवळ 3,आळजापूर 1, सस्तेवाडी 1, जाधववाडी 2, सुरवडी 1, कोथाळे ता माळशिरस 1, अंदोरी ता खंडाळा 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments