Breaking News

सस्तेवाडीत कत्तलीसाठी चालवलेली 71 जनावरे पकडली ; 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

71 animals were caught while being taken for slaughter at Sastewadi

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ सप्टेंबर - मौजे सस्तेवाडी ता. फलटण गावच्या हद्दीत एका आयशर टेम्पोमध्ये दाटीवाटीने 71 गोवंशीय जनावरे भरून ती कत्तलीसाठी नेत असताना, फलटण ग्रामीण पोलिसांनी पकडून सुमारे 16 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फलटण येथील 2 व सरडे येथील एकजणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 14/9/2021  राेजी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास, मौजे सस्तेवाडी ता. फलटण गावच्या हद्दीत, फलटण ते शिंदेवाडी रोडवर 1) अर्षद जलील कुरेशी 2) कबीर मोहम्मद शेख दोन्ही  रा.कुरेशी नगर फलटण 3) मौला अमिन शेख रा. सरडे तालुका फलटण यांनी बेकायदा बिगर परवाना कत्तल करण्यासाठी आयशर टेम्पोमध्ये दाटीवाटीने गोवंशीय जनावरे डांबून ठेवली व त्यांचे खाण्यापिण्याची कोणतीही सोय केली नव्हती, तसेच सदरची जनावरे बेकायदा बिगर परवाना कत्तलीसाठी नेण्यासाठी आयशर टेम्पोत  भरून चालवली असताना, ग्रामीण पोलिसांनी पकडली असून, त्यामध्ये 7 लाख 55 हजार रुपये किमतीची 71 गोवंशीय जनावरे व 8 लाख 50 हजार रुपये किमतीचा आयशर टेम्पो  वाहन असे एकूण  16 लाख 05 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

    संबंधित आरोपींना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कर्णे हे करीत आहेत.

No comments