बजरंग पुनियाने कांस्य पदक जिंकले
गंधवार्ता वृत्तसेवा दि. 7 ऑगस्ट 2021 - टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने ६५ किलो गटात देशाला कांस्य पदक जिंकून दिले. या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील हे देशाचे दुसरे पदक आहे.
कुस्तीपटू बजरंग पुनियाने फ्रीस्टाईल कुस्तीच्या 65 किलो गटात कझाकिस्तानच्या दौलत नियाजबेकोवचा 8-0 असा पराभव केला. पहिल्या राऊंड मध्ये बजरंगने 2-0 अशी आघाडी घेतली. यामुळे दुसऱ्या राऊंड मध्ये दौलेटवर दबाव होता. बजरंगने या दबावाचा फायदा घेत सुरुवातीपासूनच हल्ला केला. परिणामी, त्याने दोनदा 2-2 गुण गोळा करून 6-0 अशी आघाडी घेतली.
शेवटी 50 सेकंद शिल्लक होते. बजरंगचे प्रशिक्षक त्याला धीर न सोडण्यासाठी वारंवार प्रोत्साहन देत होते. बजरंग देखील आज एका वेगळ्याच मूडमध्ये होता आणि त्याने पुन्हा 2 गुण मिळवत 8-0 अशी आघाडी घेतली आणि कांस्यपदक पटकावले.

No comments