पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून श्रीमंत संजीवराजे यांचे सांत्वन
फलटण: सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या मातोश्री श्रीमंत अनंतमालादेवी विजयसिंहराजे नाईक निंबाळकर (बाईसाहेब महाराज) यांचे मंगळवार (दि.२७) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. यानिमित्ताने श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी राज्यातून व जिल्ह्यातून विविध मान्यवर श्रीमंत संजीवराजे यांच्या निवासस्थानी येत आहेत. आज राज्याचे सहकार मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील हे "सरोज व्हीला" या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी आले होते.
यावेळी आमदार दिपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा बँकेचे संचालक नितीनकाका पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, राजेंद्रशेठ राजपुरे, राजेश पाटील वाठारकर, सरचिटणीस राजकुमार पाटील, खटावचे उपसभापती संतोष साळुंखे, कृष्णराज राजेमहाडिक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
No comments