Breaking News

फलटण मध्ये पोलिसांची जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम

Police training on communal riot control plan in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - बकरी ईदच्या अनुषंगाने फलटण शहर व ग्रामीण पोलिसांच्या वतीने दि. २० जुलै रोजी आखरी रास्ता, मंगळवार पेठ व कुरेशी नगर येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम करण्यात आली. त्यांनतर शहरातील प्रमुख बाजारपेठा व संवेदनशील ठिकाणाहून रुट मार्च काढण्यात आला.

मंगळवार  पेठ फलटण येथे संचलन करताना पोलिस पथक 

     दिनांक २१ जुलै २०२१ रोजी असलेल्या मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद सणाचे अनुषंगाने,  दिनांक २० जुलै २०२१ रोजी ४:३० ते ६:३० या वेळेत फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत,  उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे तसेच कार्यकारी दंडाधिकारी,फलटण श्री समीर यादव यांचे उपस्थितीत फलटण शहर पोलीस ठाणे, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, लोणंद पोलीस ठाणे असे एकत्रित मनुष्यबळ उपलब्ध करून, आखरी रस्ता,कुरेशी नगर, मंगळवार पेठ फलटण या ठिकाणी जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली.

श्रीराम पोलिस चौकी, फलटण

         जातीय दंगा काबू योजना रंगीत तालीम झालेनंतर शहरातील प्रमुख बाजारपेठा व संवेदनशील ठिकाणाहून रुट मार्च काढण्यात आला. सदरचा रूट मार्च बादशाही मस्जिद-शिवशक्ती चौक- बारामती चौक- मंगळवार पेठ- बारामती पुल-कुरेशी नगर- पचबत्ती चौक ते श्रीराम मंदिर असा काढण्यात आला.

रविवार पेठ फलटण येथे संचलन करताना पोलिस पथक 

        जातीय दंगा काबु योजना व रूट मार्च करता 7 अधिकारी, 29 पोलीस अंमलदार, Srpf चे 1 अधिकारी,7 पोलीस अंमलदार,16 होमगार्ड 1 फाईव्ह टानी गाडी,4 मोबाईल वाहने,1 ॲम्बुलन्स डॉक्टरांसह, 1 फायर ब्रिगेड गाडी उपस्थित होते.

No comments