Breaking News

निंबळकच्या विलगीकरण कक्षात विनयभंग ; पोलीस पाटलावर विनयभंग व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Molestation in the separation room of the Nimbalak ; Police have registered a case of indecency and atrocity against Police Patil

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ जुलै - निंबळक जिल्हा परिषद शाळेतील कोरोना विलीगीकरण कक्षात पीडित महिला असताना, तिच्या खोलीत येवुन, तु माझे सोबत रहा तुला व तुझ्या मुलींना काही कमी पडु देणार नाही. तुझा चांगला संभाळ करीन असे म्हणुन वाईट हेतुने पीडित महिलेचा हात धरल्या प्रकरणी निंबळक येथील पोलीस पाटील यांच्यावर विनयभंग व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१९ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ०४.३० वा सुमारास व दि.२० जुलै २०२१ रोजी सकाळी ९.३० व त्यानंतर सायंकाळी ०४.०० वा. सुमारास निंबळक ता. फलटण येथील जिल्हा परीषद शाळेतील विलगीकरण कक्षात पोलीस पाटील समाधान कळसकर रा निंबळक यांनी पीडित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला.

    पीडित महिला ही निंबळक ता. फलटण येथील जिल्हा परीषद शाळेतील विलगीकरण कक्षात असताना, तसेच ती मागासवर्गीय आहे, हे पोलीस पाटील समाधान कळकसर यांना माहीत असताना, पीडित महिलेच्या खोलीत येवुन, तु माझे सोबत रहा तुला व तुझ्या मुलींना काही कमी पडु देणार नाही. तुझा चांगला संभाळ करीन असे म्हणुन, वाईट हेतुने महिलेचा उजवा हात धरून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न करुन, तिचा विनयभंग केला. तसेच दि.२० जुलै २०२१ रोजी सकाळी ९.३० व त्यानंतर सायंकाळी ०४.०० वा. सुमारास पीडित महिलेच्या विलगीकरण कक्षातील खोलीत येवुन, तु विचार कर, माझेकडे पुष्कळ पैसे आहेत. तुझा चांगला संभाळ करीन असे म्हणुन महिलेबरोबर  लगट करण्याचा प्रयत्न करुन महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न करून  विनयभंग केला असल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.

     अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे हे करीत आहेत.

No comments