कोरोना संख्येत वाढ ; फलटण तालुक्यात 94 बाधित
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 7 जुलै 2021 - आज फलटण तालुक्यात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 94 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये शहरात 13 व्यक्ती तर ग्रामीण भागात 81 रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढला असून ही बाब चिंताजनक आहे. नागरिकांनी आताच सावधान झाले पाहिजे. आणि कंपल्सरी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.
आज दि. 7 जुलै 2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 94 बाधित आहेत. 94 चाचण्यांमध्ये 41 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 53 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 13 तर ग्रामीण भागात 81 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात निंबळक 6, साखरवाडी 6, तरडगाव 5, पाडेगाव 5, कोळकी 4, धुमाळवाडी 3, खराडेवाडी 1, ढवळ 1, बरड 1, कुरवली बु 2, मठाचीवाडी 1, मिरढे 3, पिंप्रद 2, शिंदेमाळ 1, शिंदेवाडी 1, राजुरी 3, सांगवी 4, सोमंथळी 2, वडले 1, तावडी 3, जाधववाडी 1, टाकळवाडा 2, माळशिरस ता माळशिरस 1, शेंडेवाडी ता माळशिरस 1, वारुगड ता माण 1, खामगाव 1 , कापडगाव 3, निंभोरे 2, हणमंतवाडी 1, रावडी खु 1, सस्तेवाडी 1, दुधेबावी 1, आसु 2, विडणी 1, आरडगाव 1, नांदल 1, कांबळेश्वर 1, भरणेवाडी ता इंदापुर 1, वालचंदनगर ता इंदापुर 1, नांदवळ ता कोरेगाव 1, कुळकजाई ता माण 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments