Breaking News

पालकमंत्र्यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा

The Guardian Minister took review of the flood situation in Satara district

मिरगाव आणि आंबेघर येथे एनडी आरएफ च्या टीम पाठविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

    सातारा, दि.23 (जिमाका): गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील मिरगाव आणि आंबेघर येथे दरड कोसळ्यामुळे मनुष्य हानी झाली आहे. मदतीसाठी एनडीआरएफ च्या टीम तिथे पोहचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

    जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी उपस्थित होते.

    जिल्ह्यातील बहुतांश धरणातून विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. यामुळे नद्यांच्या व ओढ्यांच्या पाणीपात मोठी वाढ झाली आहे. तरी नागरिकांनी नदीच्या तसेच ओढ्याच्या पात्रत जावू नये. डोंगरी भागात राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष रहावे व काही अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

    मिरगाव ता. पाटण येथे भूस्खलनामुळे काही कुटुंब अकडले आहेत. या ठिकाणी  एनडीआरएफच्या पथकाला जाण्यासाठी अडचणी येत होत्या. या पथकाने कोयनेच्या बँक वॉटरमधून बचाव कार्य सुरु केले आहे. ओढ्याला पूर आल्यामुळे व दरड कोसळल्यामुळे आंबेघर येथे जाण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत, परंतु या ठिकाणी दरड हटविण्याचे काम प्रशासन करीत आहे.

    कोयना धरणातून 45 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. तसेच इतर धरणांमधून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हे सर्व पाणी कृष्णा नदीपात्रात येत असल्याने नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

No comments