मनाली ते खारदुंगला सायकलिंग करुन 2 युवकांनी दिला 'जागतिक तापमान वाढ' थांबवण्याचा संदेश
![]() |
खारदुंगला येथे मल्लिकार्जुन कोले व महेश घनवट |
गंधवार्ता वृत्तसेवा - महाराष्ट्रातील मल्लिकार्जुन कोले (सोलापूर) व महेश घनवट (सातारा) या जिल्ह्यातील दोन तरूणांनी ६ जुलै ते १५ जुलै २०२१ असा ५५० कि.मी. मनाली (हिमाचल प्रदेश) ते खारदुंगला (लडाख) चा सायकल प्रवास करून, जगातील सर्वात उंच रस्त्यावरून खारदुंगला टॉप (१८२८० फुट) येथे जागतिक तापमान वाढ थांबवण्याचा संदेश दिला. लेहचा खरदुंगला टॉप हा जगातील सर्वात उंचावरील रोड आहे.
मनाली ते खारदुंगला सायकलिंग प्रवासाबद्दल माहिती देताना मल्लिकार्जुन कोले व महेश घनवट यांनी सांगितले की, दिनांक ६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता मनाली येथून सायकलिंग ला सुरुवात केली. पालचान, साेलंग व्हॅली, अटल टनेल (९.२ किमी) असा निसर्गरम्य आणि डोंगराचे रौद्र रुप पाहत ४० किलोमीटरचा प्रवास सिसु गावी थांंबला. त्यानंतर सिसु ते जिसपा ५३ किमी प्रवास निसर्गाने नटलेल्या डोंगरावरील केलांग या शहरातून झाला.
जिसपा मधुन निघाल्या नंतर दारचा च्या लहोल-स्पिटी मधिल सर्वात लांब पुला नंतर १४ किलोमीटर चढाई चा आनंद घेत पाटसिवो मधिल तळ्या जवळ आम्ही दोघेजण पोहोचलो. त्या दिवशी दुपारच्या जेवणाची सोय उपलब्ध नसल्यामुळे इतर प्रवाशांच्या मदतीने दिवस काढून, आम्ही झिंग झिंग बार ला पोहोचलो आणि नेटवर्क च्या दुनियेत गायब झाले.
![]() |
मोहिमेची सुरवात मनाली येथून करताना मल्लिकार्जुन कोले व महेश घनवट |
आयुष्याच्या चढ उतारा प्रमाणे आम्ही रस्त्यावरील चढ उतार, सपाट प्रदेश तसेच बर्फाळ प्रदेशातुन अनमोल प्रदेशाची, क्षणांची, फोटोग्राफी, व्हिडिओ शुटींग करत हिमाचल प्रदेश राज्याची सिमा ओलांडून सरचू या गावी पोहोचलो.
या भागात रस्ता मातीचा होता. मातीचा रस्ता आणि त्यातून चारचाकी वाहन गेल्यानंतर उडणारा धुळीचा लोट, त्यामुळे आम्हाला सायकल चालवणे कठीण झाले होते. पांग पर्यंत कोणतीही जेवणाची व राहण्याची सोय नसल्याने नाइलाजाने आम्हाला सायकल टेम्पोने घाटा लुप(२१ लुप), नकीला पास (१५५४७ फुट), लांगचांगला पास (१६६१६ फुट) करत पांग ला पोहोचलो. नंतर पुन्हा पांगचा ३ किमी चढ चढून ४०किमी सपाट प्रदेश पार करुन, डेबरी्ंग ला पोहोचलो. त्यानंतर तांगलांगला चा २४ किलोमीटरची चढाई त्या मध्ये येणारा पाउस आणि बर्फव्रष्टी चा आनंद घेत आम्ही उपसी ला पोहोचलो. उपसी नंतर लेह, लेह नंतर खारदुंगला (जगातील सर्वात उंच रोड १८३८०फुट) ची ३९ किलोमीटरची चढाई केली व जागतिक तापमान वाढ" थांबवण्याचा संदेश देऊन, आम्ही आमची मोहीम पूर्ण केली.
या मोहिमे साठी आमचे मित्र रुषीकेश गाजरे, दिगंबर शिंदे (पंढरपूर) यांनी संपूर्ण १० दिवस सोबत राहुन, मोलाची साथ दिली. या मोहिमेत निसर्गाला जवळुन पाहण्याचा छोटासा अनुभव घेतला. त्याच बरोबर शारीरिक, मानसिक ताकद आजमावून पाहिली.तसेच या मोहिमेत आरोग्याच्या कसोटी चा सामना करावा लागला. आणि सायकल मोहीम करून जागतिक तापमान वाढ या मुद्दा कडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला याचे आम्हाला समाधान वाटते असेही शेवटी मल्लिकार्जुन कोले व महेश घनवट यांनी सांगितले.
No comments