निंभोरे येथे स्वराज्य दिन उत्साहात साजरा
निभोंरे -: महाराष्ट्र शासनाने ६ जून, शिवराज्यभिषेक दिन हा "स्वराज्य दिन" म्हणून जाहीर केला आहे, त्यानुसार ग्रामपंचायत निंभोरे येथे स्वराज्य दिनी गुढी उभारून "स्वराज्य दिन" उत्साह पार पडला.तसेच पर्यावरण दिन व स्वराज्य दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण देखील करण्यात आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे उपसरपंच मुकुंदराव रणवरे (काका) यांनी सांगितले, यावेळी सरपंच सौ. कांचन निंबाळकर (ताई) सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शिवभक्त आणि निंभोरे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
![]() |
वृक्षारोपण करताना सरपंच सौ. कांचन निंबाळकर (ताई), उपसरपंच मुकुंदराव रणवरे व ग्रामपंचायत सदस्य |
No comments