Breaking News

गर्दी जमवून, विनापरवाना लग्न केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई

Punitive action for without permission marriage by gathering a crowd

    गंधवार्ता वृत्तसेवा  फलटण - कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी लावलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करून, गर्दी जमवून लग्न समारंभ पार पडल्या प्रकरणी बरड येथील मातोश्री मंगल कार्यालय व फलटण येथील गांधी कुटुंबियांच्या वर दंडात्मक कारवाई करण्यात आली.  यामध्ये मातोश्री मंगल कार्यालय बरड यांच्या व्यवस्थापकांकडून ५० हजार रुपये  व  गांधी कुटुंबियांकडून २५ हजार रुपयांचा दंड  वसूल करण्यात आला आहे.

     शुक्रवार दि. ४ जून रोजी मातोश्री मंगल कार्यालय येथे विवाहास परवानगी न घेता, गर्दी जमवून  धडाक्यात लग्न लावण्यात आले. याप्रकरणी ग्रामपंचायत बरड व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी कारवाई करत,  मातोश्री मंगल कार्यालय बरड  चे व्यवस्थापक पुष्कराज शेंडे  यांच्याकडून 50 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

     शनिवार दि. ५ जून रोजी सायंकाळी ५  वाजण्याच्या सुमारास पुणे रोडवरील रानडे पेट्रोल पंपासमोर, वैभव हिम्मतलाल गांधी यांच्या बंगल्यात विनापरवाना लग्नसोहळा आयोजित करुन, गर्दी केल्याप्रकरणी फलटण नगरपरिषद व फलटण शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करुन गांधी कुटुंबाकडून सुमारे २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

No comments