Breaking News

शेतीविषयक दुकानांबाबत व शैक्षणिक साहित्य पुरविण्याबाबत प्रशासनाचे सुधारीत आदेश

Revised order of administration regarding supply of agricultural shops and educational materials

    सातारा   (जिमाका): सातारा जिल्ह्यात 7 जून पासून जिल्हा प्रशासनाकडून शनिवार व रविवार यादिवशी संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळी वैध कारणाशिवाय कोणत्याही नागरीकास संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये सुधारणा करुन शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणा-या सेवांची दुकाने आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शेतीविषयक (मशागत)करण्याची सेवा करण्यास आठवड्याचे सर्व दिवस सायं 4 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

      तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून 14 जानेवारी पासून सकाळी 9 ते 2 या वेळेत केवळ शैक्षणिक साहित्य घरपोच पुरविण्यास परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

No comments